मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह गुरुवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलाव उघडण्यास तसेच योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा सगळे बंद करण्यात आले होते. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे. असे असले तरीही कोरोनासंदर्भातील सुरक्षेचे सगळे नियम अर्थात मार्गदर्शक कार्यप्रणाली (एसओपी) पाळणे बंधनकारक असणार आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने होणार्या अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडीसाठी निधीमंजूर झाला …