माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
हार्मोनी स्पोर्ट्स क्लब आणि रायगड बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये टर्फ क्रिकेटचे सामने रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार झाला. पनवेल नाव मोठे करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करूया, असे आवाहन त्यांनी केले.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर, निसार सय्यद आणि दीपक सारीजच्या सौजन्याने हा सत्कार सोहळा झाला. या सोहळ्यास अध्यक्ष अली सिद्दीकी, खजिनदार फरहान मुलजी, सहसचिव सईद सैयद, अय्याज मस्ती, रूपेश नागवेकर, निसार सय्यद, निखील सोनी, निशांत सावंत, आदित्य देशमुख, विजय शिंदे, संतोष विखारे आदी उपस्थित होते.
या वेळी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल ओमकार भगत, पुनित पाटील, अॅथेलिटिक्समध्ये साहिल पाटील, कराटे स्पर्धेत विनायक कुमार, राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत स्टॅनली, स्केटींग अंगद शेट्टी, रेसलिंग स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल शौर्य कोलेकर या गुणवंत खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.