पनवेल : रायगड जिल्ह्यात 141 नव्या कोरोना रुग्णांची व पाच जणांंच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 6) झाली, तर दिवसभरात 149 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 57 व ग्रामीण 16) तालुक्यातील 73, उरण 23, अलिबाग 12, पेण 10, रोहा सात, कर्जत सहा, माणगांव पाच, खालापूर चार, श्रीवर्धन तालुक्यात एकाचा समावेश आहे. तर मयत रुग्णांमध्ये पनवेल मनपा तीन, उरण व पेण येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,766 आणि मृतांची संख्या 1,569 झाली आहे. आतापर्यंत 51,937 जण कोरोनामुक्त झाल्याने 1,260 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …