Breaking News

सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

पनवेल ः वार्ताहर

खारघर वसाहतीमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या असंख्य महिलांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

खारघर शिवसेना शहर संघटक नंदाताई चेडे यांच्या प्रयत्नाने तेथील गीतांजली सोनार, सुलोचना भुवड, दीपिका सोनार, संध्या सोनार, पद्मा ढगे या प्रमुख महिला सामाजिक कार्यकर्त्यांसह इतर महिलांनी खारघर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या वेळी जिल्हा महिला आघाडी उपसंघटक कल्पना पाटील, विधानसभा संघटक रेवती सपकाळ, महानगरप्रमुख अ‍ॅड. शुभांगी शेलार, तालुका संघटक सुजाता कदम, उपतालुका संघटक रिया अरोरा यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला आघाडीच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply