Breaking News

उरण येथे उद्या महायुतीचा मेळावा

उरण ः वार्ताहर

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील शिवसेना-भाजप- आरपीआय युतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप (उरण) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेशशेठ बालदी, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, भाजपा उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जिल्हा परिषद सदस्या रिना घरत, उरण पंचायत समिती सदस्य सर्वश्री दीपक ठाकूर,  हिराजी घरत, दिशा पाटील, भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपा उरण तालुका महिला अध्यक्षा संगीता पाटील, शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना तालुका संघटक बी. एन. डाकी, शिवसेना उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना तालुका महिला संघटक सुजाता गायकवाड, विधानसभा संघटक ज्योती म्हात्रे, उपसंघटक ममता पाटील, तालुका संघटक प्रचिती म्हात्रे, आरपीआय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड आदी मान्यवर, लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply