Breaking News

खोपोलीतील शैक्षणिक समस्यांबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुख्याधिकार्‍यांची भेट

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
कोकण विभाग शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खोपोलीतील नगर परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात शुक्रवारी (दि. 30) मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांची घेतली भेट घेतली.
या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात; अन्यथा येणार्‍या पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येईल, असे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्याधिकार्‍यांना सांगितले. सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्याधिकार्‍यांनी या वेळी दिले.
मुख्याधकार्‍यांच्या दालनात झालेल्या बैठकीत खोपोली नगर परिषदेच्या शाळा, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस प्रमोद पिंगळे, युवा नेते राहुल जाधव, चिटणीस गोपाळ बावस्कर, गीता मोहिते, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस वंदना म्हात्रे, शहर अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, उपाध्यक्ष अपर्णा साठे, सुप्रिया नंदे, शिक्षक दिलीप म्हसे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
बैठकीस ऋषिकेश म्हात्रे, हिंमत मोरे, शिक्षक जनार्दन सताने, नारायण सकपाळ, नरेश पाटील, दुबे सर, अल्ताफ जळगावकर, स्वाती जोशी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो आहे.

Check Also

वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले …

Leave a Reply