Breaking News

मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित  37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील दोन आणि शहरातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अजून काही जणांचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. दुसरीकडे कोर्लई गावात एका 45 वर्षीय पुरुषाचा आणि मुरूड शहरातील मारूती नाका येथील 61 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी दिली.

नागोठण्यात नऊ रुग्णांची भर

नागोठणे : येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत रोहे तालुक्यातील नागोठणे शहरात चार, सुकेळी येथे एक, तर पेण तालुक्यात विभागातील बेणसे येथे चार असे एकूण नऊ रुग्ण आढळले आहेत. यापैकी नागोठणे शहरात आढळलेला एक संशयित वृद्ध इसम मृत्यू पावला असून, त्यांचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply