Breaking News

कोप्रोली भाजपतर्फे आमदार महेश बालदी यांना निवेदन

उरण : वार्ताहर – सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे वर्ग केलेल्या खोपटे ते चिरनेर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना नाले व गटारांचा मुळप्रश्न उद्भवणार आहे. गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी हे नाले गावाच्या लगत असणार्‍या नैसर्गिक पाणलोट क्षेत्रात समाविष्ट करावे, असे निवेदन कोप्रोली भाजप शाखा व विभाग कमिटी यांनी आमदार महेश बालदी यांना दिले.

या वेळी या समस्येकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन आमदार बालदी यांनी दिले. निवेदन देताना विभाग अध्यक्ष शशी पाटील, पूर्व विभाग युवा अध्यक्ष प्रवीण घासे, तालुका पदाधिकारी दत्तराज म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन गावंड, कोप्रोली कार्याध्यक्ष निलेश पाटील, युवा नेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply