पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये बैठकीचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मालमत्ता कर आणि कचर्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. ही बैठक सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयात अनेक विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मालमत्त कर हा लोअर इनकम गृ्रप आणि इतरांना कशा प्रकारे कमीत कमी प्रमाणात लावता या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कळंबोली परिसरात पडलेला कचरा हा तत्काळ साफ कण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच जे नागरिक घंटा गाड्या ज्या वेळेत येतात त्यावेळी कचरा न टाकत इतरत्र टाकतात त्यांना दंड आकरण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव रामदास महानवर आदी उपस्थित होते.