Breaking News

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई सिटी विजेता

मुंबई ः प्रतिनिधी

बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 2-1 असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली. फतोर्डा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने 18व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली, पण 29व्या मिनिटाला टिरी याच्या स्वयंगोलमुळे मुंबई सिटीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. टिरीने हेडरद्वारे चेंडूला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलरक्षक पुढे आल्याने चेंडू सरळ गोलजाळ्यात गेला. 90व्या मिनिटाला चेंडू अडवण्याच्या नादात मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य पुढे आला, पण गोलजाळ्याच्या जवळ असलेल्या बार्थोलोमेऊ ओगबेचे याने चेंडूवर नियंत्रण राखत तो बिपीनकडे सोपवला. त्यानंतर बिपीनने कोणतीही चूक न करता शानदार गोल करीत मुंबई सिटीच्या विजयावर नाव कोरले.

पुरस्कारांचे मानकरी : गोल्डन बूट : इगोर अँग्युलो (एफसी गोवा, 14 गोल), गोल्डन ग्लोव्हज : अरिंदम भट्टाचार्य (एटीके मोहन बागान), गोल्डन बॉल : रॉय कृष्णा (एटीके मोहन बागान), उदयोन्मुख खेळाडू : लालेंगमाविया (नॉर्थईस्ट युनायटेड).

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply