Breaking News

श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुरावा
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेल शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. बर्‍याच ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडल्यामुळे रहदारीस त्रास होत होता, तसेच या परिसरात हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णवाहिका ने रुग्णांना आणतांना त्रास होत होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी विक्रांत पाटील यांना याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून रस्त्याचे डांबरीकरण करून घेण्याबाबत पत्रव्यवहार केला. विक्रांत पाटील यांच्या सतत पाठपुरावा यश आले असून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरवात करण्यात आली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply