Breaking News

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान

मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये मंगळवारी (दि. 1) मतदान प्रक्रिया शांततेत झाली. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक या जागांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावर परिणाम दिसून आला.
या निवडणुकीनंतर राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रितरीत्या प्रथमच निवडणूक लढवत आहेत, तर भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीने महाआघाडीला तगडे आव्हान निर्माण केले आहे. पाचही जागांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनानची नांदी ठरेल -चंद्रकांत पाटील
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ही निवडणूक महाराष्ट्रात परिवर्तनानची नांदी ठरेल. आजची निवडणूक ही महाविकास आघाडीला एक मोठा हादरा देईल. लोकाशाहीमध्ये जनतेकडे मतदान हेच एकमेव असे प्रभावी शस्त्र आहे, जे सरकारला त्यांच्या अपयशी कारभाराची जाणीव करून देतो. या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आघाडी सरकारला किती कंटाळले आहेत हे समजेल. यासोबतच सरकारमध्ये नसूनही ज्या प्रकारचे समर्थन पदवीधर आणि शिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यात केले, ते फारच उत्साहवर्धक होते. या निवडणुकीमुळे सरकारच्या बहुमताला काही फरक पडणार नाही, मात्र पुढे तरी सरकार जनहितार्थ कार्य करण्याचा विचार तरी करेल अशी इच्छा व्यक्त करतो.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply