पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 58,854 झाला असून, मृतांची संख्या 1614 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 56,400 जण कोरोनामुक्त झाले असून, 840 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण
खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …