Breaking News

नेरळमधील महिला पोलीस कर्मचारी लाचप्रकरणी अटक

कर्जत : बातमीदार

नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून आरोपी यांच्याकडून 40 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.नेरळ मधील मुस्लिम महिला विवाह होऊन मुंबई सासरी गेल्यानंतर तेथे सासरच्या मंडळीकडून झालेला छळ याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल आहे.दरम्यान,या गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करू नये यासाठी 40 हजाराची रक्कम मागितली होती आणि संबंधित लाच प्रकरण ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होते.या प्रकरणात आज महिला पोलीस शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

नेरळ गावातील मुस्लिम धर्मीय महिला यांचा विवाह मुंबई येथील मुस्लिम तरुणाशी झाला होता.त्या विवाहित तरुणीचा सासरी मुंबई येथे छळ होत होता.त्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहित तरुणी नेरळ येथे आपल्या माहेरी निघून आली.त्यानंतर देखील सासरची मंडळी यांच्याकडून हुंड्याची मागणी होत असल्याने संबंधित मुस्लिम धर्मीय महिला यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार केली.ही तक्रार लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा सप्टेंबर 2020 मध्ये झाला होता.त्यानंतर या हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक मारहाण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी नेरळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र या गुन्ह्यातील आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविला होता.नेरळ पोलीस ठाणे मधील दाखल गुन्हा 5/2020 मध्ये संबंधित आरोपी यांच्यावर भारतीय दंड संहिता 498(अ) तसेच 323,504,506,34 आणि मुस्लिम महिला अधिनियम 2019चे कलम 3 आणि 4 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास 32 वर्षीय महिला पोलीस नाईक या करीत होत्या.

या प्रकरणात आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविल्यानंतर गुन्ह्याचा तपास असलेल्या महिला पोलीस शिपाई यांनी आरोपी यांना आपला जबाब नोंदविण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात येण्यासाठी सप्टेंबर 2020 मध्ये फोन केला होता. त्यावेळी आपल्याला अटकपूर्व जामीन घेण्यासाठी मदत करण्याकरिता आणि अटक न करण्यासाठी तपासी महिला पोलीस शिपाई यांनी 40 हजाराची लाच मागितली अशी तक्रार मुंबई येथील हुंड्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडे यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.संबंधित प्रकरणी अटकपूर्व जामीन घेणार्‍या आरोपी यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच प्रकरणी तपास करणारे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस विचारे,सोडकर,महिला पोलीस नाईक गणपते,राजपूत यांनी आज 10 डिसेंबर रोजी नेरळ येथे येऊन नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीत राहणार्‍या 32 वर्षीय महिला पोलीस यांना अटक केली.या प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण झाला नाही अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चोपडे यांनी सांगितले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply