पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आज आपला देश प्रगतिपथावर वेगाने पुढे जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 11) दुपारी 2.30 वाजता खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये प्रज्ञावंत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. अमरेंद्र भोळे, दिलीप गोडांबे, जयश्री चित्रे, आयोजक व प्रज्ञा प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक दर्शन प्रभू, पनवेल शहर संयोजक डॉ. मयुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.