नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांचा पुढाकार
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवरील गतिरोधकांवर सफेद मार्किंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. भाजप नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने गतिरोधकांवर सफेद पट्टे मारण्यात आले.
खारघर सेक्टर 4 बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवर जवळपास पाच गतिरोधक आहेत या गतिरोधकांवर कुठल्याही प्रकारची सफेद मार्किंग निदर्शनास येत नसल्याने रहिवाशांसाठी अपघाती क्षेत्र निर्माण झाले होते. तसेच सेक्टर 10 मधल्या एका रहिवाशाला आपला जीव सुद्धा गमवावा लागला. या बाबत सिडकोसोबत बर्याच वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको प्रशासनाने या समस्येकडे टाळाटाळ केली.
त्यामुळे रहिवाशांना अपघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांना ही बाब सांगितली. उपाध्याय यांनी तत्काळ त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास राहणारी लहान मुले, महिला व पुरुष यांच्या सहाय्याने सर्व गतिरोधकांवर सफेद रंगाचे पट्टे मारले. तसेच या कार्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा हातभार लावला.