Breaking News

कमला देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेकडून नामंजूर

चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमला देशेकरच

पनवेल : रामप्रहर वृत्त

सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केल्याने चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपच्या कमला एकनाथ देशेकर याच असणार आहेत.

चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब तहसीलदार संजय मांडे व ग्रामसेविका वंदना अहिरे यांच्या उपस्थितीत 15 डिसेंबर रोजी चिंध्रण ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये चिंध्रण गावातील मतदारांनी गुप्त मतदान केले. एकूण 1351 मतदान झाले. त्यामध्ये 23 मत बाद ठरविण्यात आली. विरोधकांच्या बाजूने 653 मतदारांनी मतदान केले तर कमला एकनाथ देशकर यांना 675 मतदरांनी मतदान केले. त्यामुळे 22 मतांनी कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केला.

पुन्हा एकदा चिंध्रण गावातील मतदारांनी कमला एकनाथ देशेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा एकदा सरपंच पदासाठी निवडूण देवून विरोधी सदस्यांना एक चपराक दिली आहे. ज्या भापजच्या सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला त्या सदस्यांना भाजपातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ देशेकर यांनी दिली आहे.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून व चिंध्रण गावातील विकास कामे पाहून पुन्हा एकदा चिंध्रण गावातील मतदारांनी चिंध्रण ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच म्हणून मला निवडूण देवून गावाचा विकास करण्याची संधी दिली आहे.

-कमला एकनाथ देशेकर, सरपंच, ग्रामपंचायत चिंध्रण

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply