Breaking News

वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडून गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी
आपण समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात व्हीडीआयपीएल’च्या वतीने गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले.  
गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायत सरपंच हेमलता भगत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, उद्योजक अजय कांडपिळे, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, कमलाकर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, माई भोईर, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुनीता घरत, भाजप नेते विश्वनाथ कोळी, अजय भगत, पनवेल शहर युवा मोर्चा सरचिटणीस गौरव कांडपिळे, पंकज पाटील, साईचरण म्हात्रे, किशोर पाटील, सुनील कोळी, शेखर देशमुख, वामन ठाकूर, ‘व्हीडीआयपीएल’चे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख, संचालक अमोल देशमुख, भाग्यश्री देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, अशा सामाजिक भानातून माणुसकीचे दर्शन आणि समाजाप्रति असलेली आस्था प्रकट होते, तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल देशमुख कुटुंबीयांचे कौतुक केले. वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सतत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे त्यांच्यामार्फत कोरोनाच्या संकटकाळात गरीब, गरजूंना अन्नधान्य वाटप करून योगदान देण्यात आले होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply