Breaking News

श्री गणेश कार्यशाळात कारागिरांची लगबग

रेवदंडा ः प्रतिनिधी

गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपल्याने श्री गणेश कार्यशाळेत मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे, श्री गणेश कार्यशाळेत माती काम, रंगकाम व आखणी या कामात कारागीर मग्न झाले असून दिवस व रात्र कामे सुरू असलेली दिसून येतात.

आराध्य दैवत श्री गणरायाची मूर्ती बनविण्याचे कसबी कारागीर कार्यशाळेत काम करीत आहेत, विविध रूपातील श्री गणेश मुर्ती साकारताना नाविन्याला प्राधान्य दिले जाते. कार्यशाळेत दीड, दोन, तिन, चार, पाच, सहा फुटी उंचीच्या श्री गणेशमूर्ती कारागीर घडवित आहे. अलिबाग व मुरूड तालुक्यात श्री गणेश कार्यशाळेत शाडू मातीच्या मूर्तीची मागणी भक्त मंडळी करतात, त्यामुळे शाडू मातीपासून घडविलेल्या मुर्ती ठिकठिकाणी कार्यशाळेत दिसून येतात.

रेवदंडा येथील पुजा आर्ट श्री गणेश कार्यशाळेतील नंदकुमार चुनेकर यांचेशी संपर्क साधला असता, कार्यशाळेत कुशल व कसबी कारागिरांची समस्या असून युवा वर्ग मूर्ती घडविण्याचे कला आत्मसात करीत नसल्याची खंत व्यक्त केली, तसेच प्रतिवर्षी रंग, माती आदीचे वाढते दर यामुळे मूर्तीच्या किंमतीत नाईलाजाने वाढ करावी लागते. सध्या कार्यशाळेत कामाची लगबग सुरू आहे, असे म्हटले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply