पेण : प्रतिनिधी
महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजनेच्या नावाखाली शेतकर्यांसाठी सर्व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट संगणक प्रणाली सुरू केली आहे, त्याचा लाभ पेण तालुक्यातील शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन पेण तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे हीींिीं://ारहरवलीांरहरळीं.र्सेीं.ळप/ हे संकेतस्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, किंवा ग्राहक सेवा केंद्रावरून (उडउ), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदीच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणार्या सर्व शेतकर्यांना त्यांचा आधार क्रमांक हीींिीं://ारहरवलीांरहरळीं.र्सेीं.ळप/ या संकेत स्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे, ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. ज्या शेतकर्यांनी या योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत.