Breaking News

वणवा विझवताना वन कर्मचारी जखमी; वनपालाच्या प्रसंगावधानाने वाचले वॉचमनचे प्राण

कडाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मुळगाव येथील डोंगराला लागलेला वनवा विझविण्याच्या प्रयत्नात वनविभागाचे रोजंदारी वॉचमन रामचंद्र देशमुख जखमी झाले. वनपाल काळूराम लांघी यांनी त्यांना वेळीच डोंगरावरून खाली आणले आणि रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने वॉचमन देशमुख यांचे प्राण वाचले आहेत. कर्जत तालुक्यातील खांडपे वन परिमंडळातील मुळगाव कंपार्टमेंटमधील डोंगरावर बुधवारी (दि. 23) संध्याकाळी वणवा लागला होता. वनपाल के. डी. लांघी त्यांचे सहकारी वनरक्षक टी. आर. पिचड, पी. डी. पवार, ए. एम. शेख, रोजंदारी वॉचमन रामचंद्र देशमुख आदी कर्मचारी वणवा विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वार्‍यामुळे वणवा पसरत होता. वणव्याची धग आणि धूराचा वाचमन देशमुख यांना त्रास सुरु झाला. चक्कर येऊन त्यांच्या शरिराची एक बाजू काम करेनाशी झाली. वनपाल लांघी व अन्य कर्मचार्‍यांच्या ते लक्षात आले. लांघी यांनी प्रसंगावधान दाखवून देशमुख यांना लगेचच डोंगरावरून उचलून खाली आणले व कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वेळेत उपचार सुरू करून देशमुख यांना पुढील उपचारासाठी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात  आले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply