Breaking News

महेंद्रसिंह धोनी होणार मालामाल!

आयपीएलमध्ये 150 कोटी पगार घेणारा पहिलाच खेळाडू

रांची : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये सर्वाधिक पगार घेणार्‍या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी अग्रस्थानावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याने सर्वांत जास्त म्हणजेच 137 कोटी पगार घेतला आहे आणि यंदा होणार्‍या आयपीएल-14मध्ये तो आणखी एक विक्रम नावावर करणार आहे.

आयपीएलच्या पुढील पर्वात धोनी आयपीएलमध्ये 150 कोटी पगार घेणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने पुढील पर्वातही धोनीच संघाचे नेतृत्व करेल हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो 150 कोटींचा पल्ला ओलांडेल हे नक्की आहे.

 व्यावसायिक क्रिकेटच्या इतिहासात 150 कोटींचा पल्ला ओलांडणारा धोनी हा पहिलाच खेळाडू ठरणार आहे. धोनीने पहिल्या तीन पर्वांत 18 कोटी पगार घेतला. त्यानंतर पुढील तीन पर्वांत त्याचा पगार हा 8.28 कोटी झाला. 2014 व 2015मध्ये त्याने 12.5 कोटी प्रतिपर्व घेतले. रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने त्या दोन पर्वांत 25 कोटी पगार घेतला.

2018च्या लिलावात सीएसकेने त्याला 15 कोटींत संघात कायम राखले. त्यानंतर त्याने पुढील तीन पर्वांमध्ये सीएसकेकडून 45 कोटी इतका पगार घेतला. आयपीएल 2021साठी मेगा अ‍ॅक्शन होणार नसल्याने धोनीला यंदाही 15 कोटी पगार मिळणार आहे. हा केवळ पगाराचा आकडा आहे. यात जर सामन्यातून पुरस्काररूपी मिळालेली रक्कम बेरीज केल्यास धोनी 200 कोटींचा पल्ला सहज पार करेल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 131 कोटी इतका पगार घेतला आहे. मुंबई इंडियन्स त्याला 15 कोटी पगार देते. त्यामुळे तो यंदा 146 कोटींपर्यंत पोहचेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत 126 कोटी पगार घेतला आहे. त्याला आरसीबीने यंदा 17 कोटी दिल्यास तो 143 कोटींपर्यंत पोहचेल, तर सुरेश रैना व एबी डिव्हिलियर्स हे आयपीएल-14मध्ये 100 कोटी पगाराचा पल्ला ओलांडतील.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply