पनवेल : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असलेले गरजवंत, गोरगरीबांना यातून दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विरोधी पक्ष मदतीला सरसावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आम्ही 52 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे. आमदारांच्या निधीच्या माध्यमातून किंवा इतर मदतीच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्य जमा करून राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपदा कोष तयार केला आहे. त्यातून आम्ही राज्यात आमच्या सेवा चालवतो. आमच्या आमदारांचे पगार आम्ही आपदा कोषमध्ये दिले आहेत. आतापर्यंत आम्ही अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. तीन-चार दिवसांत 13 ते 14 लाख लोकांपर्यंत पोहचू. 52 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते.
फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपने गरीब, गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यास बुधवारी (दि. 1) संध्याकाळी प्रभाग 17मधील शिवाजीनगरमधून सुरुवात केली.
मदत देतेवेळी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, तसेच राहुल वाहुळकर, रावसाहेब खरात, महापालिकेच्या अधिकारी विनया म्हात्रे, अरुण कोळी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात पनवेलच्या प्रभाग 17 आणि 19मधील आठ झोपडपट्ट्यांमधील 4 हजार 500 हजार कुटुंबांना दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अॅड. भुजबळ यांनी दिली.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …