Breaking News

यंदा बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा?

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि 64व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ही स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणावर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होतो. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती, मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.

सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्कॅनिंग आदी कोविड-19करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply