Breaking News

वाहनांची परस्पर विक्री करणार्या व्यक्तीस अटक

पनवेल : वार्ताहर

वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून गाड्यांची परस्पर विक्री करणार्‍या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप राघो शेट्टी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे.

प्रफुल्ल दिपक वाझे व इतर साक्षीदारांना संदीप शेट्टी याने वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून त्यांची वाहने ताब्यात घेतली. दोन ते तीन महिने भाडे देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने भाडे देणे त्यांनी बंद केले असता वाझे व इतर साक्षीदारांनी त्यांची वाहने परत मागण्यास सुरूवात केली, मात्र आरोपीने ही वाहने परस्पर विक्री करून किंवा गहाण ठेवून विल्हेवाट लावली. या घटनेचा गुन्हा दाखल होताच शोध पोलिसांनी तपास करून आरोपी संदीप राघो शेट्टी याला अटक केली. आरोपीकडून एर्टीगा, इनोवा, वॅगन आर, स्विफ्ट अशी सुमारे एक कोटी रूपयांची एकूण नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच कळंबोली पोलीस ठाणेकडील  भा. दं. वि. कलम 406 हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्हयाचा तपास खांदेश्वर पोलीस ठाणेमार्फत चालु आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply