कामोठे भाजप कार्यालयात कार्यक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने कामोठे आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भाजप कामोठे मंडळ सरचिटणीस भास्कर दांडेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक आघाडी समन्वयक शेखर जगताप व कायदे सेल संयोजक अॅड. जय पावणेकर यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
या वेळी कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका पुष्प कुत्तरवाडे, युवा नेते हॅप्पी सिंग, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, जिल्हा चिटणीस जयश्री धापटे, मनीषा वणवे, सुरेखा लांडे, कल्पना जाधव, सुनीता शर्मा व इतर महिला मोर्चा पदाधिकारी तसेच ओबीसी सेल संयोजक भाऊ भगत, विजय लोखंडे, व्यापारी आघाडीचे संयोजक नाना मगदूम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे शहर युवा मोर्चातर्फे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिरटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, किरण जाधव, प्रवीण कोरडे, आदित्य भगत, सुरेंद्र हळ्ळीकर, धीरज सिंग यांनी केले होते.
‘सीकेटी’त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. वसंत बर्हाटे यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर प्राचार्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पराक्रमाची महती आणि आदर्शवत तत्वाची गरज आजच्या तरुण पिढीला किती महत्त्वाची आहेत हे सांगितले. त्याचबरोबरच त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलुंवरती प्रकाश टाकून उपस्थितांना त्यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाद्वारे करण्यात आले. त्यामध्ये विशेषकरून राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यकारी अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव तसेच तानाजी देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, प्रा. के. एन. ढवळे, ग्रंथपाल रमाकांत नवघरे, इतर शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.