Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघोडे येथे घंटागाडीचे लोकार्पण

उरण ः रामप्रहर वृत्त
इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी (दि. 15) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी, अशी मागणी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी संबंधित कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश बालदी व कामगार नेते जितेंद्र घरत यांनी कंपनीकडे केला. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळाली आहे.
या वेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी घंटागाडी लोकार्पण सोहळा हे एक निमित्त असून गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी जे काही माझ्याकडून लागेल ते सर्व सहकार्य करीन, असे आश्वासन दिले तसेच जी काही विकासकामे माझ्याकडून गावाला अपेक्षित आहेत ती कामे कामे लवकरात लवकर करण्याचेही नमूद केले.
कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सीईओ अतुल खराटे यांनी आपले विचार मांडताना, आमच्या कंपनीकडून गावाच्या दृष्टीने जे काही चांगले आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि पुढेही करीत राहू, असे सांगितले.
या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामगार नेते जितेंद्र घरत, प्रसाद पाटील, देवेंद्र पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, भाजपचे दिघोडे अध्यक्ष राजेश पाटील, समीर मढवी, रमेश पाटील, चंद्रकांत कडू, सुभाष माळी, ग्रामपंचायत उपसरपंच अभिजित पाटील, खोपटे सरपंच सौ. ठाकूर, सुचित्र घरत, अनंता म्हात्रे, कैलास म्हात्रे, अलंकार कोळी, संदेश पाटील, उज्ज्वला अनंत म्हात्रे, अपेक्षा अतिश पाटील, अपेक्षा राकेश कासकर, आरती शक्ती कोळी, रेखा नरहरी कोळी, ग्रामसेविका मत्सगंधा पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, अनिल पाटील, वरूण पाटील, समाधान पाटील, सचिन पाटील, अभिजित ठाकूर, रघुनाथ पाटील, मंदार पाटील, रमेश घरत, संतोष पाटील, नरहरी कोळी, गजानन पाटील, विलास पाटील, राकेश कासकर, अलंकार पाटील, अविनाश म्हात्रे, सचिन कासकर, शक्ती गोवारी, गंगाराम पाटील, धनवान पाटील, अतिश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यवस्थापनाकडून भूपेश शर्मा, संदीप काळे, सतीश म्हात्रे, प्रफुल्ल ठाकूर, परमानंद ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply