राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपा खारघर-तळोजा मंडल महिला मोर्चा आघाडी यांच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले.
या वेळी उत्तर रायगड महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या सारबिंदरे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा वनीता पाटील, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर महिला आघाडी सरचिटणीस साधना पवार, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, खारघर मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, महिला आघाडी अध्यक्ष प्रतीक्षा कदम, सदस्य स्मिता आचार्य, श्यामला शेट्टीघर, सीमा खडसे, शोभा मिश्रा आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.