Breaking News

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर; पनवेलमध्ये भाजपच नंबर वन!

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघासह तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवत बाजी मारली आहे. विशेषकरून अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या शिलेदारांनी काबीज करीत शेकापसह महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे महाविकास आघाडीची बिकट, तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील 14 पैकी 9 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. आकुर्ली ग्रामपंचायत यापूर्वीच भाजपने पूर्णत: बिनविरोध जिंकली असून, पाली देवद, उमरोली, वाजे, खानाव, वारदोली, केवाळे, वाकडी, खैरवाडी ग्रामपंचायतीही भाजपने जिंकून विरोधकांना पराभवाची धूळ चारली. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पाली देवद, वाजे, खानाव ग्रामपंचायतींमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत विजयश्री प्राप्त केली. त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. विजयासाठी भाजपच्या त्या-त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पाली देवद ग्रामपंचायतीत चेतन पांडुरंग केणी, दिवेश भगत, पूनम भगत, प्राची अमित जाधव, पुष्पा पांडुरंग म्हसकर, ज्योती रवींद्र केणी, कविता पोपेटा, महेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, योगिता पाटील निवडून आले असून, अशोक पाटील आणि अनिता पाटील यापूर्वीच बिनविरोध विजयी आले आहेत. वाजे ग्रामपंचायतीत पदू नामदेव वाघ, काळी शाम कातकरी, अंजली राजेंद्र भालेकर, कमला किसन कातकरी, भारती शामकांत भालेकर, रेवन आत्माराम पाटील, मथुरा मदन पाटील; उमरोली ग्रामपंचायतीत रोशन शांताराम पोपेटा, शुभांगी नरेश मढवी, अलका प्रकाश तांडेल, प्रितेश तुकाराम डांगरकर, कमला बळीराम मढवी, बेबी ठाकूर, श्वेता चंद्रकांत मढवी, किरण डांगरकर (बिनविरोध), रेश्मा पाटील (बिनविरोध); वारदोली ग्रामपंचायतीत राम पदू भवर, संगीता बाळू भुतांबरा, जान्हवी जितेंद्र बताले, दिनेश बाळाराम पाटील, हेमंत रघुनाथ तांडेल, सविता संतोष पाटील, अर्पिता अनंत पवार; खानाव ग्रामपंचायतीत बाळाराम कोंडू पाटील, जयश्री शशिकांत दिसले (दोन ठिकाणी), चंदा निलेश वारदे, हरिश्चंद्र भुर्‍या गोंधळी, नीलम मनोहर अरिवले; केवाळे ग्रामपंचायतीत बारकी अंबो पारधी, रेणुका अशोक गायकर, कांचन परशुराम पालकर, करुणा रवींद्र गायकर; वलप ग्रामपंचायतीत नवनाथ महादू खुटारकर, ज्योत्स्ना राजेश पाटील; पाले बुद्रुक ग्रामपंचायतीत नीलम गजानन भोईर, लक्ष्मण तुकाराम उलवेकर, सिद्धी संदीप तांडेल विजयी झाले. वाकडी ग्रामपंचायतीत नऊपैकी सहा, तर खैरवाडी ग्रामपंचायतीत सातपैकी पाच जागा जिंकून भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शेकापचे नेते व माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील यांचा पुतण्या विघ्नेश पाटील यांचा भाजपचे नवनाथ महादू खुटारकर यांनी पराभव करून जोरदार धक्का दिला.

साई ग्रामपंचायतीमधील माजी आमदार विवेक पाटील यांच्या कासारभाट गावात अपक्ष उमेदवार सुजित शंकर पाटील यांनी शेकाप उमेदवाराचा 136 मतांनी दणदणीत पराभव केला. 

उरण मतदारसंघातही विकासाचे ‘कमळ’ फुलले

आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण विधानसभा मतदारसंघातील व पनवेल तालुक्यात मोडणार्‍या सावळे, सांगुर्ली आणि पोसरी ग्रामपंचायतींमध्ये भाजपने तसेच देवळोली ग्रामपंचायतीत भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीने विजय मिळविला. सावळे ग्रामपंचायतीत सुनील माळी, रश्मी राम गाताडे, प्रशांत माळी, कांता कांबळे, सुरेखा कुरंगळे, सतीश म्हसकर, प्रगती जांभूळकर यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपचा झेंडा फडकवला. सांगुर्ली ग्रामपंचायतीत पद्माकर कातकरी, सुवर्णा पाटील, वसंत पाटील, संतोष पारधी, निर्मला ठोकळ, शरद वांगीलकर यांनी विजय मिळवत कमळ फुलवले. कोळखे ग्रामपंचायतीत भाजपच्या लीना राजेंद्र पाटील, सारिका राजेश सुरते, अपेक्षा जाधव, अशोक मुंढे विजयी झाले, तर पोसरी ग्रामपंचायतीत सातपैकी सहा जागा जिंकून शेकापच्या सत्तेला सुरूंग लावला. विजयी उमेदवारांचे आमदार महेश बालदी आणि भाजप पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply