पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत खारघर सेक्टर 19 येथील सिडको उद्यानात ई टॉयलेट बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन इनटॉप बिल्डींगचे चेअरमन प्रवीण पटेल यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) झाले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि भारत पेट्रोलियल कॉर्पोरेशन लि.च्या सीएसआर निधीमधून खारघर येथे ई टॉयलेट बांधण्यात आले आहे. या ई टॉयलेटच्या उद्घाटन कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, किरण पाटील, वासुदेव पाटील, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, दिलीप जाधव, भरत कोंडिलकर, अस्मिता आचार्य, सिकर चौहान आदी उपस्थित होते.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …