नागोठणे : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच तिरंगी मास्क चेहर्यावर लावून ध्वजाचा अपमान होवू नये, राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकणे यावर कडक कारवाई करावी, या संदर्भात येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नागोठणे पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. संबंधित निवेदन शुक्रवारी (दि. 22)सायंकाळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना देण्यात आले.
यावेळी समितीचे धनाजी दपके, कीर्तिकुमार कळस, हभप बापूमहाराज रावकर, बाळू रटाटे, सुधाकर मेस्त्री आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.