पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 24 एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. याबाबत ऑनलाइन घोषणा करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, परीक्षक भरत साळवे, राहुल वैद्य, नाट्य परिषदेच्या पनवेल येथील शाखेचे कार्यवाह शाम पुंडे, सदस्य अमोल खेर, गणेश जगताप, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी चिन्मय समेळ, सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन आदी उपस्थित होते. महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका : दुसरा आईन्स्टाईन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरीवली), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉजेज, मुंबई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाईट लाईट, ठाणे), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), 12 कि.मी. (ए.एस.एम. प्रोडक्शन, मुंबई), लव्ह अॅण्ड रिलेशनशीप (आमचे आम्ही, पुणे), क्लिक (ओम साई कलामंच, वसई), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), आर ओके (सी. के. टी. कॉलेज, पनवेल), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), गुंतता (निर्मिती, वसई), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाईम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी.एम.सी.सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे).