रोहे ः देशभर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रोह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी रूट मार्च काढला होता. संचारबंदीत पोलीस सतर्क असून सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांसह तीन वाहतूक पोलीस, 25 रोहा पोलीस, चार होमगार्डचा सहभाग असलेल्या रोहा पोलिसांनी रोहा पोलीस ठाणे ते फिरोज टॉकीज, तीन बत्ती नाका, बाजारपेठ, राम मारुती चौक, रोहा अष्टमी नगर परिषद चौक, रोहा एसटी स्टॅण्ड ते तीन बत्ती नाका असा रूट मार्च काढण्यात आला.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …