धाटाव : प्रतिनिधी
धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीचे इंजिनीरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांडून संचलन करण्यात आले. विवेक गर्ग यांनी सर्व कर्मचारी, कामगारांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुदर्शननगर या कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमध्येही ध्वजारोहण समारंभ झाला. कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक माधुरी सणस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. परिसर स्वच्छता, प्रामाणिकपणा आदी गोष्टी अंमलात आणून देशकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माधुरी सणस यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी दिघे व सूत्रसंचालन अरविंद निषाद यांनी केले. कार्यक्रमास संजय शेवडे, लेफ्टनंन कर्नल ठाकूर, अॅड. विशाल घोरपडे, रुपेश मारबते, समीर वाडवळ यांच्यासह कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
रातवड विद्यालयात ध्वजवंदन व बक्षीस वितरण
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रजासत्ताक दिन व नागरिकांची कर्तव्ये या विषयावर सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत वैद्य यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विद्यालयाचे संस्कृतिक विभाग प्रमुख मनोहर पुरी यांनी केले. डॉ. श्रीकांत वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व शालेय समिती सदस्य सतीश पवार, मुख्याध्यापक म. स. जाधव व मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.