Breaking News

उरणमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान मेळावे

उरण : वार्ताहर

प्रथम शिक्षण संस्था व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमधील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान मेळावे घेतले जात होते परंतु कोरोनामुळे सोमवार (दि. 16) पासून बंद करण्यात आले आहेत. पुढील काळात राहिलेल्या जिल्हा परिषद शाळेत घेतले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे.  लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होत आहे. प्रत्येक शाळेत असे मेळावे आयोजित करत असल्याकारणाने प्रथम शिक्षण संस्था व महानगर गॅस यांच्या टीमचे गावागावातून कौतुक करण्यात आले. आत्तापर्यंत सोनारी, करळ, सावरखार, पागोटे, रानसई, मोठीजुई, कोप्रोली, गोवठणे, आवरे या नऊ शाळांमध्ये हे मेळावे झाले असून इतर शाळांवर कोरोनामुळे पुढे काही दिवसांत हे मेळावे घेतले जाणार आहेत. या वैज्ञानिक मेळाव्यांना त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा कमिटी पदाधिकारी, व सदस्य तसेच पालक व नागरीकांचेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभात होते. तसेच हे मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रथम शिक्षण संस्थेचे डीआरएल सुशील परब व त्यांचे सहकारी मोहन पिंगळा, संतोष दळवी, तपस्या कडू, राणीत ठाकूर, काशीराम निरगुडे हे मेहनत घेत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply