Tuesday , March 28 2023
Breaking News

45वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था

पश्चिम बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 45व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ‘ड’ गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडिशाचा 40-19 असा पराभव करीत या गटात अपराजित राहत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांनीदेखील ‘क’ गटात हिमाचल प्रदेशचा 35-31 असा पराभव करीत या गटात अव्वल क्रमांक पटकावत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात ओडिशाला एक लोण देत 23-09 अशी भक्कम आघाडी राखली होती. या मोठ्या आघाडीमुळे प्रशिक्षिका वीणा खवळे (शेलटकर) हिने आपल्या राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी दिली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सोनाली हेळवी, प्रतीक्षा तांडेल यांच्या दमदार चढाया, त्याला साक्षी रहाटेच्या पकडीची मिळालेली मजबूत साथ यामुळे हा विजय सोपा गेला. महाराष्ट्राच्या मुलांनीही पूर्वार्धात हिमाचल प्रदेशला एक लोण देत 22-09 अशी आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राला उत्तरार्धात हिमाचलने चांगलेच झुंजवले. लोणची परतफेड करीत हिमाचलने महाराष्ट्राची आघाडी कमी करीत आणली, पण मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचे प्रशिक्षक आयुब पठाण व लक्ष्मण गावंड यांनी खेळाडूंना सामना शांतपणे खेळण्यास प्रवृत्त करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पंकज मोहिते, असलम इनामदार यांचा अष्टपैलू खेळ, त्याला शुभम शेळके, सौरभ पाटीलच्या मिळालेल्या चढाईच्या साथीमुळे हा विजय मिळविता आला. महाराष्ट्राचा बचाव उत्तरार्धात दुबळा ठरला.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply