Breaking News

धोनीचा पारा चढला; मैदानात चहरला झापले

चेन्नई : वृत्तसंस्था

महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर किंग्स इलेव्हन पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 22 धावांनी जिंकला. सामन्यात कॅप्टन कूल धोनीचा पारा मात्र चढलेला पाहायला मिळाला. त्याने दीपक चहरला चांगलेच सुनावले. धोनी फार क्वचितच रागावलेला पाहायला मिळाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने चहरला सुनावले. चहरने सलग दोन नो बॉल टाकल्यामुळे धोनी त्याच्यावर रागावला आणि भर मैदानात त्याने शाळा घेतली. त्यानंतर चहरने पंजाबच्या डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला. पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मार्‍यासमोर चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही, पण महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पंजाबला 5 बाद 138 धावाच करता आल्या.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply