Breaking News

महाडमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना लस

महाड : प्रतिनिधी

महाडमध्ये बुधवार (दि. 3) पासून कोरोना लसीकरणाला  सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील जवळपास 950 जणांना लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे. महाड तालुक्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असून जनजीवनदेखील पूर्वपदावर आले आहे. तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लसीकरण करण्यास सुरूवात झाली असून, बुधवारी महाड ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंभावे आणि बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी लसीकरण करून घेतले. तर गुरुवारी ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे  लसीकरण करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर जगताप यांनी सर्वप्रथम लसीकरण करून घेतले. त्यांनतर इतर डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी यादीप्रमाणे लसीकरण करून घेतले.

महाडमध्ये पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना लसीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत 44जणांनी लसीकरण केले आहे. हे लसीकरण सुरक्षित असून पुढील टप्प्यात सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. –

डॉ. भास्कर जगताप वैद्यकीय अधीक्षक, ग्रामिण रुग्णालय महाड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply