Breaking News

नेरळ भाजपकडून आदिवासी भागात छत्र्यावाटप

कर्जत : बातमीदार – नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील ग्रामस्थांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्र्या वितरित केल्या.

टपालवाडी आणि लव्हाळवाडीमधील आदिवासींनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या आदिवासी ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांनी छत्र्यावाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेरळ भाजपचे शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, भाजप तालुका चिटणीस पराग गायकवाड, युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या हस्ते टपालवाडी आणि लव्हाळवाडीमध्ये जाऊन छत्र्या वाटप करण्यात आल्या.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनमोहन अग्रवाल, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत मिस्त्री, माजी शहर अध्यक्ष अनिल पटेल, वाहतूक सेलचे गणेश शेळके, गोरख शेप यांच्या उपस्थितीत आदिवासी वाड्यांमधील ज्येष्ठ नागरिक आणि दाम्पत्यांना छत्र्या भेट देण्यात आल्या. या वेळी भाजपचे तरुण कार्यकर्ते प्रकाश पेमारे, प्रशांत देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य नरेश पवार, नरेंद्र कराळे, योगेश ठक्कर, दत्ता ठमके, दत्ता डायरे, योगेश कोळंबे, सचिन लोभी, धनंजय धुळे, गणेश कराळे, महेश खराटे आणि विमल व्यास हे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, लव्हाळवाडीमध्ये समाज मंदिर नसल्याची खंत ग्रामस्थ धर्मा पारधी यांनी व्यक्त केली. त्या वेळी 15 ऑगस्टपूर्वी आपण या कामाचा शुभारंभ करू, असे आश्वासन मंगेश म्हसकर यांनी आदिवासी ग्रामस्थांना दिले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply