कर्जत : बातमीदार
शहरासोबत गावातील मुलामुलींना शॉर्टफिल्मच्या माध्यमातून संधी देता यावी यासाठी दिग्दर्शक प्रदीप गोगटे यांनी प्रयत्न केला आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळी नाटके बसविली. अनेक नाटके राज्यस्तरीय प्रसिद्ध झाली आहेत. त्यातून आपली कला दाखविण्यासाठी एका शॉर्टफिल्मचे काम सुरू असून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम प्रदीप गोगटे करीत आहेत. या शॉर्टफिल्मच्या शूटिंगचा मुहूर्त उद्योजक महेश वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. शॉर्टफिल्ममध्ये ऋत्वि ओसवाल, आरवी ओसवाल, राज साळवी, स्पंदन पडते, साईराज खंडागळे, राजवी डोंबे आणि स्फूर्ती पडते या बालकलाकारांच्या पूजा बंदरकर, विशाल रोकडे, दिगंबर म्हसकर, शर्वरी जाधव आणि हेमंत वाघुले यांनी भूमिका साकारल्या आहेत. शॉर्टफिल्मचा स्क्रीन प्ले हर्ष जाधवने केला असून डीओपी हृषीकेश दांडेकर, तर एडिटिंग प्रथमेश जाधव यांनी अतिशय छान पद्धतीने केले आहे. शॉर्टफिल्मची कथा आणि दिग्दर्शन प्रदीप गोगटे यांचे आहे, तसेच प्रॉडक्शन्स टीम म्हणून दिलीप गोगटे, मितेश कोळी, मोहित जाधव, शुभम कलघटगी, नचिकेत लाड, बाबू सकपाळ आणि तुकाराम जाधव यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली आहे, तसेच मेकअप अभय शिंदे, फोटो डिझाइन्स माधुरी गोगटे, संगीत स्टुडिओ साऊंड गॅरेज यांनी केले आहे. या शॉर्टफिल्मसाठी जितेंद्र ओसवाल, महेश वैद्य, मुकेश सुर्वे यांनी मदतीचा हात दिला. शॉर्टफिल्मचे चित्रीकरण कर्जत आणि नेवाळी, आवळस येथे झाले. यासाठी आनंद कानडे, ऑटो रिक्षा कृष्णा ठोंबरे, चंद्रकांत जाधव, सुर्वे सर, लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या कांचन थोरवे आणि त्यांचे सहकारी, गणेश सायन्स क्लासेसचे सायली महाडिक, सौरभ तेलवणे, मंदार मुरकुटे तसेच दिनेश कडू, शुभांगी कडू, इको ग्रीन सोसायटी, रमाकांत पाटील जेवण व्यवस्था, लक्ष्मण मंडावळे या सर्वांचे सहकार्य लाभले. एक वेगळा आणि छान विषय घेऊन येणारी शॉर्टफिल्म वळणचे स्क्रीनिंग मार्चच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे.