Breaking News

पनवेल मनपा देणार गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

समन्वय समितीच्या बैठकीत महापौरांची घोषणा

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिकेने गुरुवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गणेशोत्सव 2019 समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यंदापासून महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम देखावे सादर करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा केली.

या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, पोलीस उपायुक्त दुधे, महावितरणचे अभियंता राठोड, चौधरी, सिडकोचे अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी,  पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त गणेश देशमुख यांनी उत्सव साजरा करताना न्यायालयाच्या आदेशाचा मान राखणे आवश्यक आहे.

जागेबाबत पूर्वी जी परिस्थिती होती तशीच ठेवण्यात येईल. दोन्ही नेत्यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन केलेल्या मागणीचाही विचार करण्यात येईल, असे सांगितले.     

या वेळी गणेशोत्सव शांततेत आणि साधेपणाने साजरा करून जमलेल्या वर्गणीतील 25 टक्के रक्कम पूरग्रस्त निधीला दिल्यास आपण सामाजिक भान जपल्यासारखे होईल, असे सांगून पोलीस उपायुक्त दुधे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी महापालिका, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे उद्भवलेल्या प्रकरणाचा अनुभव सांगून खड्ड्यात जाण्यापूर्वी खड्डे भरण्याचे आवाहन केले.

पनवेल महापालिका हद्दीतील उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्‍या जाहिरातींवरील परवाना शुल्क माफ करावे, तसेच विसर्जन घाट व त्याकडे जाणारे रस्ते व्यवस्थित करण्याची आणि त्या ठिकाणी क्रेन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली पाहिजे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply