दक्षता देसाई ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी

अलिबाग येथेरंगला सोहळा

अलिबाग ः प्रतिनिधी
यंदाची मिस टीन इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा गुरुवारी (दि. 11) सायंकाळी अलिबाग येथे पार पडली. या वेळी गुणवत्तेच्या जोरावर दक्षता देसाई यंदाची ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी ठरली आहे. आता ती टीन इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नेहा पाटील उपविजेती, तर तनिशा चौगुलेने तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे.  
किशोरवयीन मुलींसाठी असलेली ही सौंदर्य स्पर्धा अलिबागजवळच्या ट्रॉपिकाना रिसॉर्टच्या हिरवळीवर झाली. डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भव्यदिव्य समारंभात सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते किताब देऊन सन्मानित करण्यात आले. कोविडमुळे सुरुवातीला 30 स्पर्धक स्पर्धेत ऑनलाइन फेर्‍यांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यातील आठ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
बुद्धिमत्ता, ग्रेस, मानवता व सामाजिक कौशल्य याद्वारे स्पर्धकांची चाचणी घेण्यात आली. मागील वर्षीची टीन युनिव्हर्स अपूर्वा ठाकूरसह कविता ठाकूर, प्रवीण ठाकूर, अमित नाईक, रवींद्र ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते. अशा प्रकारची स्पर्धा अलिबागेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे अलिबागकरांना एक वेगळा अनुभव मिळाला. आपल्या अदाकारीने या तरुणींनी उपस्थित सर्वांनाच मोहवून टाकले. अधूनमधून सादर होणारे स्थानिक कलाकारांचे नृत्य प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होते.

Check Also

Как найти безопасное зеркало мостбет в интернете?

Как найти безопасное зеркало мостбет в интернете? Поиск безопасного зеркала мостбет в интернете может оказаться …

Leave a Reply