पाली : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला आणि या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार आपदग्रस्तांना मदत केल्याचा दावा करीत असले तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी व ठाकूर बांधव तीन महिने उलटून गेल्यानंतरदेखील नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात आदिवासी लोक भरडून निघाले आहेत. निसर्गाने निवाराच मोडून टाकल्याने शासनाच्या भरपाईशिवाय पुन्हा उभे राहणे त्यांना कठीण बनले आहे. चक्रीवादळ होऊन तीन महिने उलटून गेले. तरीही सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडीत एका दमडीचीही मदत पोहोचलेली नाही.
अखेर सततच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप मदने यांनी चंदरगाव आदिवासीवाडीतील नुकसानग्रस्त घरांची प्रशासनामार्फत पाहणी केली. या वेळी दलित पँथरचे नितीन यादव, मनसेचे केवल चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper