Monday , February 6 2023

किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा’

अलिबाग : प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा उपनिबंधकांनी

केले आहे.

किसान क्रेडिट कार्ड या योजनेस पात्र शेतकर्‍यांनी आपल्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयांना भेट देऊन त्यांच्याकडील असलेला अर्ज भरून तो संबंधित बँक शाखेकडे द्यावा. या अर्जासोबत शेतकर्‍यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, मोबाइल क्रमांक, पासपोर्टसाइज फोटो जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक  असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून अधिकाधिक शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घ्यावा.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply