Breaking News

पनवेल तालुक्यात 118 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात 118  नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू  झाला आहे. तर 39 रुग्णांनी  कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 25) पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. पालिका हद्दीत 82 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा  मृत्यू झाला आहे तर 35  रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 36 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी

पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात आज 118 नवीन रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पनवेल कोळीवाडा धोबीआळीतील 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीत 16 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 298 झाली आहे. त्यामध्ये एलआयजी सेक्टर 1 मधील एकाच कुटुंबातील एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. कामोठे मध्ये 12 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 463 झाली आहे. सेक्टर 36 मयूर पार्क मधील एकाच कुटुंबाती 3 व्यक्तींचा समावेश आहे. खारघरमध्ये 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 334 झाली आहे. 

नवीन पनवेल मध्ये 15 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 240 झाली आहे. त्यामध्ये सेक्टर 4 पौर्णिमा ज्योत मध्ये एकाच कुटुंबातील 6 व्यक्तींचा समावेश आहे.  पनवेलमध्ये 20  नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 206  झाली आहे.  यामध्ये तक्का येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 71 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1612 रुग्ण झाले असून 1090 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.62  टक्के आहे. 456   रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 66  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये उलवे, विचुंबे, आकुर्ली येथे प्रत्येकी चार, शिरढोण, करंजाडे, वावंजे येथे प्रत्येकी तीन, वडघर, चिखले, चिंचपाडा, कोळवाडी, सुकापूर येथे प्रत्येकी दोन, पारगाव, उसर्ली खुर्द, भोकरपाडा, तरघर, कोळखे येथे प्रत्येकी एक अशी आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये विचुंबे दोन व आकुर्ली, उलवे येथे प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. 

खालापूर गावात कोरोनाचा शिरकाव

खालापूर : प्रतिनिधी

चार लॉकडाऊनमध्ये कोरोनाला रोखण्यात यश मिळवलेल्या खालापूर नगरपंचायत हद्दीत अखेर कोरोनाने शिरकाव केला असून 45 वर्षीय महिलेचा मंगळवारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल खालापूर तहसीलला प्राप्त झाला.

खालापूर नगरपंचायत हद्दीत बाजारपेठेत राहणारी महिला कर्करोगावर उपचारासाठी मुंबईत जात होती. कोणतीही लक्षण दिसत नसताना उपचार सुरू असलेल्या ठिकाणी कोरोना चाचणी घेतली असता महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला. खालापूर गावात पहिला रूग्ण आढळला आहे. संसर्गजन्य महिलेला इंडिया बुल येथे कोविड रूग्णालयात हलविण्यात आले असून पती व मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून खालापूर बाजारपेठेचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

उरण तालुक्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील गुरुवारी (दि. 25) करंजा येथील एक 41 वर्षीय महिला, रांजनपाडा-जासई येथील 23 वर्षीय महिला व 3 वर्षीय मुलगी, बालई-उरण येथील येथील 41 वर्षीय पुरुष, जेएनपीटी येथील 22 वर्षीय पुरुष, नागाव येथील 36 वर्षीय पुरुष, धुतुम येथील 34 वर्षीय महिला असे सात नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच जांभूळपाडा येथील 18 वर्षीय पुरुष यास डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 230 झाली आहे. त्यातील 186  बरे झालेले असून त्यांना  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. फक्त 42  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील कामोठे एमजीएम रुग्णालयात11, पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सहा, डि. वाय. पाटील हॉस्पिटल दोन, कोरोना केअर सेंटर बोकडविरा 13, होम क्वारंटाइन सहा, सुखम हॉस्पिटल पनवेल एक, सानपाडा हॉस्पिटल एक, तोलारीफ हॉस्पिटल खारघर एक, अपोलो हॉस्पिटल एक असे रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

कर्जत तालुक्यात सात जणांना कोरोना

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोरोना चा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही. आज कर्जत तालुक्यात आणखी सात नवीन रुग्ण आढळून आले असून कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 88 वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये कर्जत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply