Monday , January 30 2023
Breaking News

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पेण : प्रतिनिधी
स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी (दि. 13) पेण येथे भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे रोहा तालुका उपाध्यक्ष विष्णू मोरे व रवींद्र काशिनाथ तारू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. पेणमधील वैकुंठ निवास येथे झालेल्या कार्यक्रमात विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील माजी सरपंच नारायण भोईटे, मीनाक्षी बारस्कर, माजी पोलीस पाटील मंगेश अंबुसकर, ग्रामपंचायत सदस्य हनुमान मराठे, माजी सदस्य नितेश सुरेश जाधव यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.  
खासदार तटकरे यांनी श्रीवर्धनकडे लक्ष लावल्यामुळे रोहा तालुक्याचा विकास खुंटला आहे. अशा वेळी कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांचा रोहा तालुक्याला मोठा आधार वाटत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवत विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील अनेक कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याचे रोहा तालुका भाजप उपाध्यक्ष विष्णू मोरे यांनी सांगितले.
रोहा तालुक्यातील प्रत्येक वाडी, वस्त्यांवरील लोकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावून तेथील विकासकामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी दिली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply