Breaking News

विचुंबे येथे 15 लाखांचा चरस जप्त, दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर, बातमीदार

खांदेश्वर पोलिसांनी विचुंबे येथून दोन किलो वजनाच्या 15 लाखांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश बाबू साखरे (20, विचुंबे) व कर्मवीर उर्फ बिटू रघुराज सिंग (26, विचुंबे) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. खांदेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंध कायदा  एनपीडीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन इसम चरस या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप माने व पोलीस नाईक सुमंत बांगर यांना मिळाली होती. त्यानुसार वपोनी योगेश मोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, पोलीस शिपाई अमोल कोळी, महेश अहिरे, बांगर यांना त्या ठिकाणी छापा टाकण्यास सांगितले. पोलिसांनी विचुंबे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सापळा रचला असता आरोपी आकाश साखरे व कर्मवीर उर्फ बिटू सिंग याच्याकडे दोन किलो 970 ग्रॅम वजनाचा 15 लाख 5 हजार रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थ सापडून आला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply