Breaking News

मुरूड नांदगाव येथे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी

ऐरोली नवी मुंबई येथील जय हिंद अकादमी या संस्थेने नांदगाव (ता. मुरूड) येथील लक्ष्मी फॉरेस्ट कॅम्पिंग येथे घेतलेल्या तीन दिवसांच्या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात 15 पुरुष आणि तीन महिला सहभागी झाल्या होत्या.

मुरुड येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात एन. एस. जी ब्लॅककॅट कमांडो रामेश्वर मिश्रा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

शिबिरामध्ये रायफल शूटिंग, टॅक्टिकल ट्रेनिंग, थिअरी, जंगल ट्रेक, ड्रिल, मार्चिंग, सेल्फ डिफेन्स  इत्यादी प्रकार शिकवले गेले. त्याचबरोबर भरती संबंधी कागदपत्रे, फॉर्म कसा भरावा, भरती प्रक्रिया, मुलाखत, आरोग्य चाचणी संबधी माहिती, विविध पदे आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता इत्यादींची इत्यंभूत माहिती करून दिली गेली. मुंबई पोलीस दलाच्या क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असलेले विनायक आंबरे यांनी या शिबिरात पोलीस दलातील विविध संधी याबाबत  मार्गदर्शन केले. लक्ष्मी फॉरेस्ट कॅम्पिंगचे मालक महेंद्र चोरघे यांनी  या चांगल्या उपक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली.

शिबिराच्या समारोपाच्या वेळी क्यूडोकान कराटे डो संस्थेचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रेंशी अरुण बोडके, सेन्सेई विनायक सकपाळ, अरविंद भोपी, संजय भगत, मिकी मुनिस यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला.

Check Also

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करीत …

Leave a Reply