Breaking News

पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तीन लाखांचा ऐवज लंपास

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पालीतील श्रीराम अपार्टमेंट बल्लाळेश्वर नगर येथील एका घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. व सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल तीन लाख किमतीचा ऐवज लंपास केला. या वेळी अन्य काही घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.  

पोलीस पाटील असलेल्या अमिशा अमित सांगळे या पालीच्या  बल्लाळेश्वर नगरातील श्रीराम अपार्टमेंटमधील रुम नं. 1 मध्ये राहतात. त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरुमधील लाकडी कपाटातील लॉकर तोडून तीन तोळ्याची गंथन, हार, कानातील सोन्याच्या कुडी व झुमक्यांचा जोड, दोन अंगठ्या असे सोन्याने दागिने, तसेच लॅपटॉप व पर्समधील 10 हजार रुपये रोख मिळून तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यावेळी श्रीराम अपार्टमेंटमधील राजेश बाजीराव गोळे यांच्या बंद घराचा कुलूप कोयंडा तोडून तसेच बल्लाळेश्वर नगरातील राठोड सर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताशी काहीच लागले नाही.

याप्रकरणी अमिशा सागळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पी. डी. पाटील करीत आहेत.

Check Also

शिवसेना ‘उबाठा’चे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना …

Leave a Reply