

गव्हाण : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी गव्हाण परिसरातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडली असून, मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर कार्यकर्त्यांनी जोर दिला आहे. त्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांच्या महिला पदाधिकारीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.